दोन हजाराची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह एकाला अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द(Paladhi KH) येथे शाळा आहे. आरटीईच्या(RTE) माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाल सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि  कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा. ता.चोपडा, जि.जळगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. [ads id="ads2"] 

  त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी(Gatshikshandhikari)यांच्या सांगण्यावरून तुळशीराम सैंदाणे याने २ हजार रूपये घेतांना जळगाव (Jalgaon) लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

  Jalgaon पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोनाजनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!