रावेर तालुक्यात महावितरणकडून अकोडे बहाद्दरावर कारवाईचा बडगा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  •  महावितरण कंपनीच्या धडक कारवाई, ९० ठिकाणी अकोडे जप्त
  • रावेर तालुक्यातील आकोडे बहाद्दरांचे धाबे दणाणले

  रावेर तालुक्यातील रणगावगहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर  दिनांक २४ रोज सोमवारी महावितरण (Mahavitaran) कंपनीने धडक कारवाई केली आहे.[ads id="ads1"] 

मागील काही दिवसांपासुन रावेर तालुक्यातील  रणगाव (Rangaon) व गहुखेडा (Gahukheda) गावात वारंवार फ्युज उडणे, अतिभारमुळे तार तुटणे, ह्या मुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होता. व यामुळे तक्रारीमध्ये वाढ झाली होती. [ads id="ads2"] 

  म्हणून  सोमवार रोजी सावदा विभागातील (Savda Sub Division)  कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे (Gorakshanath Sapkale) व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे (Rajesh Nemade)  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता योगेश चौधरी, विशाल किनगे,कनिष्ठ अभियंता मंगेश यादव, सचिन गुळवे, मुख्य तंत्रज्ञ जुम्मा तडवी, प्रधान तंत्रज्ञ पवन चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल पाटील, विजय पाटील, पराग चौधरी, दीपक भास्कर यांचे पथकाने रावेर तालुक्यातील  रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर धडक कारवाई केली आहे. 

हेही वाचा :- पाल घाटात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण ; सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी, वाहनधारकांमध्ये दहशत 

  सदरील कारवाईत तब्बल ९० वीजचोरीचे आकोडे काढण्यात आले असून दोन्ही गाव आकोडे मुक्त करण्यात आलेले आहे. अशी कारवाई ह्या पुढे ही निरंतर सुरु राहील अशी माहिती थोरगव्हान (Thorgavhan) कक्षाचे सहाय्यक अभियंता योगेश चौधरी यांनी दिली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!