मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना काशिनाथ भाऊ जिरी ,अंतुरली शहर काँग्रेसचे शेख भैय्या शेख करीम,तालुका काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अनिल वाडीले, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर रामू महाजन, बाळू बावस्कर ,शांताराम महाजन, नामदेव भोई वाचक व मान्यवर उपस्थित होते.[ads id="ads2"]
थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री ,अध्यापिका ,समाज सेविका आणि पहिली विद्या ग्रहण करणारी महिलादेखील आहे. याव्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटले जाते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातलं अशा महान थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

