रावेर - सावित्रीमाई फुले जयंती निमित्त येथिल तक्षशिला बुद्ध विहारात सावित्रीमाई फुले यांना माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी रजनी सपकाळे, चंद्रप्रभा गजरे, सुमन कोंघे व निर्मला तायडे यांनी सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.[ads id="ads1"]
तर संगीता दामोदरे, संगीता अटकाळे, रेखा भालेराव, उज्वला सुरदास,यांनी दीप धूप पूजा केली. यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल रंजना गजरे, संगीता अधांगळे, संगीता दामोदरे, तेजश्री तायडे, कांचन बनकर, यांनी माहिती दिली.[ads id="ads2"]
तर लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वकृत्त्व स्पर्धेत गार्गी गजरे, कोमल गजरे, प्रणिती बनकर व प्रवणी तायडे या मुलींनी सहभागी होऊन सावित्रीमाईंच्या जीवनाबाबत मनोगत कथन केले कार्यक्रमास सोनाली वाघ,सुनीता मेढे, संगीता कोंघे, प्रीती तायडे,निर्मला गजरे, निर्मला तायडे,ज्योती साळुंखे , ज्योती वाघ, वैशाली अधांगले, मंगला दामोदरे, वलभी शिरसाठ, अरुणा रायमळे, माया गाढे,
रत्नमाला भालेराव, प्रियांका गजरे, चंद्रप्रभा गजरे, जिजा जाधव, निर्मला तायडे, सिंधू गजरे,शोभा मोराने, सुनीता वानखेडे, शोभा निकम, आयुषी ससाणे, हर्षदा सुरदास, साक्षी सुरदास,अनिता गजरे,भूमी अधांगले, रेचल वाघ,गार्गी गजरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना नगरसेविका रंजना गजरे यांनी, सूत्रसंचालन कांचन बनकर यांनी तर आभार संगीता अटकाळे यांनी मानले.

