ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची संक्रांत अंधारात असून प्रशासनास जाग येणार का? अशी प्रतिक्रिया आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचेकडून येत आहेत.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे शासनाने ठरवून दिलेल्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना कोरोना काळात आपल्या जिवाची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी घराघरात जाऊन काम करत आहेत.[ads id="ads2"]
कोरोना लसीकरण पुर्ण गाव १००% कसे होईल यासाठी धावपळ करीत आहेत किशोर वयातील मुलांना शाळेत जाऊन लस घेण्यासाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत असे काम करीत असताना नियमित असलेल्या कामाकडे लक्ष देणे यात गरोदर महिलांना लसीकरण पासून ते त्यांच्या बाळंतपणा पर्यंत तर बाळंतपण झाल्यावर बाळाची दोन वर्षे पर्यंत त्यांच्या लसिकरणाचे समुपदेशन करणे किंवा त्यांच्या आरोग्य बाबत माहिती देणे किशोर वयातील मुलांना माहीती देणे हे सर्व काम आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या करीत आहेत सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची परीस्थिती जेव्हा कमावणार तेव्हा खाणार अशी आहे परंतु दोन महिन्यांपासून शासनाने मानधन अदा केलेले नाही मानधनाचा तिसरा महीना सुरू झालेला असून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या याच मानधनावर आधारित आहे मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीस तोंड द्यावे लागत आहे काहींना संध्याकाळी चुल पेटते का नाही याची चिंता लागून आहे त्यात वर्षातून येत असलेला संक्रांतीचा सण ह्या सणाला पैसे नसल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा मकरसंक्रांतीचा सण अंधारात जातो की काय अशी चिंता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना लागली आहे तरी प्रशासनाने मानधन लवकर अदा करून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची चिंता दूर करावी असा सुर त्यांच्यातून निघत आहे.