कै.लक्ष्मण महारू महाजन यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी दुःखद निधन
धरणगांव - धरणगाव येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर. सोनवणे मॅम यांचे वडील व धरणगाव शहरात वैद्यकीय सेवा पुरविणारे, महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे माजी चेअरमन दादासो. डॉ.आर.टी.सोनवणे यांचे सासरे कै. लक्ष्मण महारू महाजन [ धुळे ] यांचे आज वृध्दपकाळाने निधन झाले . ते १०१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुनबाई, दोन मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे.[ads id="ads1"]
आजोबांना सुवर्णमहोत्सवी शाळा - महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे शिक्षक बंधू - भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करून हे दुःख पेलण्याची महाजन परिवाराला शक्ती मिळो हीच निर्मिका चरणी प्रार्थना !..