राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर ( सुवर्णदिप वृत्त सेवा) -  राजमाता जिजाऊ यांची जयंती माता रमाई महिला मंडळातर्फे येथिल तक्षशिला बुद्ध विहारात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रथम जिजाऊ नगर येथिल राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून वंदन करण्यात आले. [ads id="ads1"] 
  त्यानंतर तक्षशिला बुद्ध विहारात जिजाऊ मातेच्या प्रतिमेला आशा महाले यांचे हस्ते पुष्पहार टाकून उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते दीपपूजा व धूपपूजा करण्यात आले. यावेळी तेजल तायडे,सृष्टी दामोदरे व विधी गजरे यांनी जिजाऊ मातेच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडविले त्याबद्दल उपस्थित महिलांना माहिती देऊन प्रत्येक मातेने जिजाऊंच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वागावे असे आवाहन केले. [ads id="ads2"] 
  कार्यक्रमास अंगणवाडी शिक्षिका संगीता अटकाळे,उज्वला सुरदास, रंजना अट्रावलकर ,प्रमिला लोंढे, रेखा भालेराव, सुनीता मेढे,सिंधू गजरे,निर्मला तायडे, अरुणा रायमळे, मंगला दामोदरे, अनिता गजरे, संगीता ससाणे, कविता अटकाळे, प्रीती तायडे, प्रियांका गजरे,मोनिका दामोदरे, प्रवणी तायडे, वेदिका अटकाळे,कोमल गजरे, गार्गी गजरे आदी महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका रंजना गजरे यांनी केले सूत्रसंचालन तेजल तायडे यांनी केले तर आभार संगीता दामोदरे यांनी मानले.