कुर्‍हा येथे बनावट मद्य कारखाना उद्ध्वस्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 मुक्ताईनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अलीकडेच बनावट मद्याचा  साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना जळगाव गुन्हे शाखेने कुर्‍हे येथे धाड टाकून बनावट दारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला आहे. 37 हजारांच्या मुद्देमालासह एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून दुसरा संशयीत पसार झाला आहे.
[ads id="ads1"]  मंगळवार, 11 जानेवारी रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास कुर्‍हाकाकोडा येथे ही कारवाई करण्यात आली. अमोल एकनाथ वानखेडे व अमोल वसंत भोई (रा.कुर्‍हा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत अमोल भोई  पसार झाला आहे तर अमोल वानखेडे यास अटक करण्यात आली.[ads id="ads2"] 

गोपनीय माहितीवरून कारवाई

जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाला  कुर्‍हा  येथे बनावट दारूचा  कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर अमोल वानखेडे याच्या घरात छापा टाकला. संशयीताने घराच्या गच्चीवर बनावट दारूचा मिनी कारखाना सुरू केल्याचे प्रसंगी आढळून आले. संशयीत अमोल एकनाथ वानखेडे याने आपल्या घराच्या गच्चीवर हा कारखाना गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला होता तर या व्यवसायात त्याचा साथीदार अमोल वसंत भोई (रा.कुर्‍हा) हा देखील सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक किरण धनगर, हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, रवींद्र पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, चालक हवालदार अशोक पाटील यांच्यासह कुर्‍हा दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माणिक निकम, संभाजी बिजागरे व कर्मचार्‍यांनी केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!