गुड शेपर्ड स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल (Shepard English Medium School) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"] 

               शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तद्नंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गायकवाड यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगत असतांना भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व लोकशाही गणराज्याची खऱ्या अर्थाने सुरवात २६ जानेवारी १९५० पासून झाली. [ads id="ads2"] 

  आपण सर्वांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन गायकवाड सरांनी केले. शाळेची माजी विद्यार्थिनी प्राजक्ता बाविस्कर आणि तिच्या मैत्रिणी आर्या जैन, सानिका मराठे, देवश्री महाजन, चैताली भाटीया, श्रुष्टी महाजन यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

            कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, दामिनी पगारिया, नाजुका भदाणे, हर्षाली पुरभे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन अमोल सोनार यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी स्वाती भावे यांच्यासह सर्वांनी वंदे मातरम या गीताचे समूह गायन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!