धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव येथे दि. २६ जानेवारी , २०२२ बुधवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .[ads id="ads1"]
याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल धरणगांव शाळेतील एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत शाळेतुन द्वितीय आलेली विद्यार्थीनी कु. वैशाली गुलाब माळी हिच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .[ads id="ads2"]
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वर महाजन, संचालक सुकदेव महाजन, सुभाष महाजन, गोपाल महाजन, मोतीलाल महाजन व सर्व सन्मानणीय संचालक मंडळ, शाळेचे माजी मुख्याध्यापक एस.डब्ल्यु.पाटील, एम.के.महाजन, मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, नुतन प्राथमिक विद्यामंदीरचे मुख्याध्यापक अतुल सुर्यवंशी उपस्थित होते.
सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते एस.एस. सी.बोर्डाच्या परिक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु.दिपाली नेतकर, द्वितीय - वैशाली माळी, तृतीय - रूपाली भोई यांचा रोख बक्षीस व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संचालक गोपाल सिताराम महाजन यांची कन्या टाटा कंपनी मध्ये नियुक्त झाल्याबद्दल तसेच शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांना राज्यस्तरीय व खान्देशस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वर महाजन यांच्या शुभहस्ते ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार, सर्व शिक्षक बंधु - भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या प्रजासत्ताक दिन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक व्ही.टी.माळी यांनी मानले