रोझोदा ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व श्री राम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रोझोदा येथील श्री राम मंदीर हॉल मध्ये युवा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण व सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामसिद्ध मंदिर व श्रीराम मंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष विजय आबा महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सप्तपुत ललित कला महाविद्यालय प्राचार्य अतुल मालखेडे, नेचर हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. शिवदास कोचुरे, ग्रा. प. रोझोदा सरपंच अर्चना बढे,नेचर हार्ट फाउंडेशनचे सदस्य विनायक जहुरे, अशोक फेगडे, वसंत बोंडे, भरत महाजन, भानुदास भारंबे, टेनुदास फेगडे, हे उपस्थित होते. [ads id="ads2"]
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक चंचल जगदीश धांडे तर द्वितीय क्रमांक नम्रता नामदेव चौधरी यांनी पटकावला. तसेच निलेश मोहन वाघोदे याला रावेर तालुक्यातील उत्कृष्ट युवा स्वयंसेवक म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्र रावेर तालुका समन्वयक मुस्कान फेगडे व आनंदा वाघोदे यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वडगाव येथील सुरेश वाघोदे, चेतन वाघोदे, वीरू वाघोदे, तसेच रोझोदा येथील स्नेहल धांडे, भाग्यश्री टोंगळे, दिव्या टोंगळे, अक्षय सोनवणे, वसंत बोंडे, प्रेम चौधरी, उज्वल चौधरी, रोहन टोंगळे, केतन लिधुरे यांनी प्रयत्न केले.