रावेर: मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांची गेल्या ४ महीन्या पूर्वी भडगाव येथे बदली झाली. त्यानंतर सावदा नगर पालीकेचे मुख्याधिकारी श्री चव्हाण यांचे कडे रावेर आणि मुक्ताईनगर अशा तीन ठिकाणचा पदभार देण्यात आला होता. आता त्यांच्या कडूनही रावेर नगर पालीकेचा पदभार काढून घेण्यात आला. असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने रावेर नगरपालीकेचा अतिरिक्त पदभार वरणगांव नगर पालीकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांचे कडे देण्यात आला असून येत्या दोन ते तीन दिवसात पदभार स्विकारणार असत्याचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगीतले.
रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी समीर शेख
मंगळवार, जानेवारी ११, २०२२