रावेर (प्रतिनिधी) सध्या राज्यभर गाजत असलेल्या टी इ टी घोटाळ्यात रावेर तालुक्यातील एका शिक्षकाचा शोध घेतला जात असतानाच रावेर तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून चर्चेत असणाऱ्या बनावट अपंग ग्रामसेवक प्रमाणपत्राच्या प्रकरणास वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.[ads id="ads1"]
बनावट अपंग ग्रामसेवक राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, शामकुमार नाना पाटील आणि रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई रावेर येथील गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्तावित केली आहे ; मात्र ग्रामसेवक यांना तालुका अंतर्गत तसेच जिल्हा पातळीवरून बदलीसाठी कामी येणारे हे प्रमाणपत्र मिळवून कुणी दिले? हा प्रश्न सर्वांच्या समोर होता.[ads id="ads2"]
त्याचा शोध घेतला असता, रावेर तालुका ग्रामसेवक युनियनचा एक जबाबदार प्रभारी पदाधिकारी हाच बनावट अपंग प्रमाणपत्र काही रक्कम घेऊन उपलब्ध करून देतो, अशी माहिती समोर येत आहे. हा पदाधिकरी देखील बनावट कागदपत्र दाखवून म्हणजे त्याची एन्जोप्लास्टी झालेली असतांना त्याने हृदय शस्रक्रिया झाल्याचा बनाव करून तालुक्यातील एका ग्रामपंचायतीला अनेक वर्षे ठाण मांडून बसल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.तक्रारदार अपंग ग्रामसेवक आणि हृदय शस्रक्रियाचा बनाव करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईसाठी आग्रह धरत असल्याने, त्यांच्याविरुद्ध कारवाईच होऊ नये या साठी आज ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व राज्य पदाधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रा प) यांना साकडं घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अवती भोवती ठाण मांडून होते. त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने सदर प्रकरणी पुढील करवाई बाबत जिहा परिषद प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.