विवरे प्रतिनिधि (संजय मानकरे) रावेर येथिल श्री ग गो बेंडाळे हायस्कूल मध्ये सन 2020-21मध्ये घेण्यांत आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थी कु नम्रता भिकारी गाढे 180, पुर्वेश सुनिल जयकारे 142, स्वप्निल पांडुरंग गाढे 142, कु.तेजस्विनी प्रल्हाद वाघोदे 136 गुण मिळवुन गुणवत्ता यादि त आपले स्थान दिले पक्के केले.[ads id="ads2"]
या सर्व विदयार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री धनजी लढे, व्हा चेअरमन, अध्यक्ष श्री मार्तंड भिरुळ, उपाध्यक्ष , सचिव प्रा. शैलेश राणे, संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री महाजन सर व प्रभारी मुख्याध्यापक येवले सर प्र.पर्यवेक्षक श्री वायकोळे सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. या सर्व विदयार्थ्यांना श्री प्रशांत बागुल सरांनी मार्गदर्शन केले.