भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील 32 कॉलनी परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साइटवर मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 16 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील 32 होली येथील पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम सुरू आहे. या बांधकाम साईटवर शेगाव येथील मजूर कामाला आहे. मात्र रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजय संतोष थोरात (वय 22, रा. शेगाव जिल्हा बुलढाणा) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.[ads id="ads2"]
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
हेही वाचा : - आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बामणोद येथील युवकाचे आढळले प्रेत
या तरुणाच्या अंगावर रक्ताचे डाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत इफ्तेखार अहमद समशेर खान (राहणार ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक नीलेश चौधरी हे करीत आहे.

