बामणोद येथून आठ दिवसांपासून होता बेपत्ता
गेल्या ८ दिवसांपासून बामणोद येथील एक तरुण घरातून निघून गेल्याची फैजपूर पो.स्टे. ला नोंद होती. दरम्यान, हाच तरुण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कैलास कडू सोनवणे (३६ वर्षे) मयत तरुणाचे नाव असून जागेवरच शवविच्छेदन डॉ. बारेला यांनी करून प्रेत नातेवाइकांना सोपविण्यात आले.[ads id="ads1"]
बामणोद पाडळसे रोडवर शेतात जाणाऱ्या महिलांना गेल्या ३/४ दिवसांपासून प्रेत दिसले होते. पाटबंधारे विभागाच्या कालव्यात हे शव वाहून आल्याने याबाबतची खात्री करण्याकरिता अनेक नागरिक घटनास्थळी आले, मात्र शव पालथे व फुगलेले असल्याने ओळख पटत पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी फैजपूर पो.स्टे. ला माहिती कळविली. यानंतर पाडळसे येथील पांडुरंग श्यामराव कोळी याने कालव्यातील हे शव काढण्यास मदत केली. यानंतर प्रेताची ओळख पटली.[ads id="ads2"]
मयत सोनवणे बेघर वस्तीतील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, त्याची पत्नी, मुले असा परिवार आहे. कोणाशीही भानगड नव्हती.
हेही वाचा : - ट्रॅक्टर उलटून दोघे भाऊ ठार ; भुसावळ तालुक्यातील घटना
कैलास हा शांत स्वभावाचा होता वडिलांचा चहाचा व्यवसाय असल्याने त्यांना मदत करीत असे. महिन्यापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाल्याने त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याला ७ वर्षांची एक मुलगीदेखील आहे. दरम्यान, ही घटना कशी घडली? याबाबत सुगावा लागलेला नाही.

