याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुसरी ते पिंपळगाव खुर्द दरम्यान राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरचे धूड आणि ट्रॉली पलटी झाली. चालक जालमसिंग धरमसिंग पावरा (वय १९) हा ट्रॅक्टरने (एमएच १९-एपी.३३९७, ट्रॉली क्रमांक एम.एच.एल.४४३५) राखेची वाहतूक करत होता. ट्रॉलीत राख भरून तो नेहमीप्रमाणे सोमवारी सुसरी गावमार्गे पिंपळगावकडे जात होता. [ads id="ads2"]
दुपारी एक वाजेच्या सुमारास आसरा माता मंदिराजवळ ट्रॅक्टरचे पुढील बाजूचे धूड अचानक उचकले. यामुळे भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन अपघात झाला. त्यात धूड खाली सापडून चालक जालमसिंग धरमसिंग पावरा (वय १९) आणि त्याचा सख्खा मोठा भाऊ लालमसिंग धरमसिंग पावरा (वय २३) हे दोघे दाबले जाऊन ठार झाले. तर ट्रॉलीत बसलेला महेंद्र अशोक सुरवाडे (रा.गोळेगाव) हा जखमी झाला.
हेही वाचा : - आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बामणोद येथील युवकाचे आढळले प्रेत
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील धूळकोट येथील धरमसिंग पावरा हे गेल्या सात वर्षांपासून पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुनेसह गोळेगाव येथे रोजगारानिमित्त आले होते. त्यांच्या तीन मुलांपैकी मोठा लालनसिंग (वय २३) व लहान जालमसिंग (वय १९) हे दोघेही दाबले जाऊन ठार झाले.

