रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
रावेर- रावेर कृ.उ.बा. समिती जवळील शहरातील महत्वपूर्ण चौकाला संत श्री संताजी जगनाडे महाराज चौक असे नामकरण फलकाचे अनावरण लोकप्रतिनिधी, मान्यवर नागरिक व तेली समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले.[ads id="ads1"]
जुना सावदा रोड, स्टेशन रोड व रावेर शहरात जाणाऱ्या रस्त्यावरील शहरातील महत्वपूर्ण चौकाला संत शिरोमणी संत श्री संताजी जगनाडे महाराज चौक असे नामकरण करून या चौकाला संताजी महाराजांचे नाव देण्यात आले.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार शिरीष दादा चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, कांतीलाल महाजन,माजी नगराध्यक्ष हरीश शेठ गनवाणी, रमेश महाजन, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, शे.सादिक, अॅड योगेश गजरे, सुभाष चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी माजी उपनगराध्यक्ष अॅड सुरज चौधरी, दिनेश चौधरी, सुनील चौधरी, संजय चौधरी अनिल चौधरी, भूषण महाजन, नीलेश चौधरी दिनेश चौधरी, गणेश चौधरी, पंकज चौधरी, किरण चौधरी, परेश चौधरी, चेतन चौधरी, राहुल चौधरी, शांताराम चौधरी, हिरामण चौधरी, चंद्रकांत चौधरी, भागवत चौधरी तसेच सर्व समाज बांधव व नागरिक उपस्थित होते

