रावेर तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा विवरे येथील ग गो बेंडाळे हायस्कुल येथे संपन्न झाली. यावेळी शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन धनजी लढे, अध्यक्ष मार्तंड भिरुड, उपाध्यक्ष मनोहर राणे, सचिव शैलेश राणे, संचालक गोपाळ राणे, दिलीप राणे, व्ही एस राणे, केशव राणे, ग्रा.पं. सदस्य विपीन राणे, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष जे के पाटील, ग.स.चे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, बलवाडी विद्यालायचे मुख्याध्यापक एन व्ही पाटील, सरदार जी जी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष ललित चौधरी, सचिव विजय चौधरी, विवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण महाजन उपस्थित होते. [ads id="ads2"]
यासभेत शाळा संदर्भात अडचणी, आगामी काळातील परीक्षा, शिक्षकांचे प्रश्न या विविध विषयांवर चर्चा झाली. यात उदळी हायस्कुलचे मुख्याध्यापक के आर महाजन, सतीश महाजन, पाडळे हायस्कुलचे श्री नरवाडे, रसलपूर हायस्कूलचे गोपाळ पाटील, मोरगांव येथील एस डी पाटील, थोरगव्हान, येथील मुख्याध्यापक एस. एस वैष्णव, गसच्या माजी संचालिका कल्पना पाटील, दिलीप पाटील व मुख्याध्यापक उपस्थित होते.

