भादली प्रतिनिधी (गोविंदा चिनावले) जळगाव तालुक्यातील भादली येथील एका ३५ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोडून देत आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुसरी घडली आहे.[ads id="ads1"]
भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
भादली (इंदिरा नगर) येथील शेतकरी भागवत फेगडे,हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरात धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

