यावल (सुरेश पाटील) यावल पोलिसांनी आज रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी फैजपूर रोडवर हॉटेल अंजली समोर यावल येथील एका 21 वर्षीय तरुणास 1 पिस्तोलसह 2 मोबाईल एक मोटरसायकल सह ताब्यात घेऊन आर्मी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला. [ads id="ads1"]
गुन्ह्यातील आरोपी हा यावल पोस्टेला काही महिन्यापूर्वी स्वीपर चे काम करीत असल्याने (साफसफाईचे काम) तसेच जिल्हा स्तरावरील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जवळचा नातेवाईक असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाला फार मोठी चपराक बसल्याचे बोलले जात आहे.[ads id="ads2"]
या गुन्ह्या सोबत इतर काही बेकायदेशीर कामाची,कृत्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याने तालुक्यातील जे कोणी पीडित अन्यायग्रस्त असतील त्यांनी यावल पोलीस स्टेशनची संपर्क साधल्यास फार मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.

