धरणगांव - दि. ७ जानेवारी, २०२२ शुक्रवार रोजी सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे covid-19 लसीकरण शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी शाळेतील वर्ग ९ वी व १०वी च्या मुला - मुलींचे लसीकरण करण्यात आले.[ads id="ads1"]
याप्रसंगी डॉ. मयुर जैन, आरोग्यसेविका श्रीमती किरण सोनार, आरोग्य सहाय्यक पी.एस.भदाणे, आरोग्यसेवक आर.के. देशमुख, महेंद्र माळी, औषध निर्माता दिनेश बडगुजर, डाटा एन्ट्री करणारे कुणाल चौधरी या सर्व टीम चा समावेश होता. वरील सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर. सोनवणे यांनी स्वागत केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार, पी. डी.पाटील, हेमंत माळी, सी.एम.भोळे, एम.बी.मोरे, व्ही.टी.माळी उपस्थित होते. लसीकरण शिबिर यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.