रावेर तालुक्यात जिल्ह्यावरुन येणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना रावेर तालुक्यात बसून पगार घेणाऱ्या ग्रामसेवक यांचे पाठोपाठ जिल्यावरून पदोन्नती मिळालेले ग्राम विकास अधिकारी टप्या टप्प्याने तालुक्यात हजर होत आहेत ; मात्र ते हजर होण्याच्या आधीच जि प अध्यक्ष यांच्या पतींना हाताशी धरून ग्रा प ला वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणारे स्थानिक पदाधिकारी व त्यांचे लाडके ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी नवीन आलेल्या ग्राम विकास अधिकारी यांना हजरच होऊ देत नसल्याने, सी ई ओ च्या आदेशालाही केराची टोपली दाखवली जात असल्याचे अनाकलनीय चित्र रावेर तालुक्यात दिसून येत आहे.[ads id="ads1"]
दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने ४५ ग्रामसेवक यांना पदोन्नती दिल्या, पंचायत समिती अंतर्गत वाघोदा बु येथे सुराळकर, केऱ्हाळे बु येथे नहाले, खानापूर येथे अविनाश पाटील, विवरे खु येथे अतुल पाटील यांची नेमणूक झाली ; मात्र खानापूर येथे आधीच ठाण मांडून बसलेले व्ही के महाजन हलले नाही, केऱ्हाळे बु येथे पदोन्नतीच्या आधीच सेटिंग लावून चार्ज घेणाऱ्या एस टी पाटील यांनी नहाले यांना थोरगव्हानचा रस्ता दाखवला.[ads id="ads2"]
तर आज वाघोदा बु येथे अतिरिक्त स्वरूपात गहूखेडा येथील कामकाज सांभाळून बनावट अपंग प्रमाणपत्र धारक ग्रामसेवक श्री नितिन महाजन यांनी स्थानिक पदाधिकारी यांचेशी संगनमत करून भुसावळ येथून आलेले सुराळकर यांना गेट आउट केले. गेल्या वर्षभरापासून पंचायत समिती स्तरावरून काही ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी यांना त्यांच्या सोयीची आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबध शाबूत ठेवण्यासाठी विशेषतः विस्तार अधिकारी( ग्रा प) संगनमताने हा प्रकार घडवत असल्याची चर्चा ग्रामसेवक यांच्यात दबक्या आवाजात सुरु आहे, यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.