जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयात दाखल असून नातेवाईकांचा शोध सुरु आहे. [ads id="ads1"]
सदर मयत इसमाचा रंग सावळा असून उंची 5 फुट 8 इंच आहे. शरीरयष्टी सतपातळ असून अंगात राखाडी रंगाचे स्वेटर, निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.[ads id="ads2"]
मेहरुण परिसरात सदर इसम मयत अवस्थेत पडून होता. परिसरातील सुज्ञ नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात आणून दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवली. सोबतच्या फोटोतील इसमाची ओळख पटल्यास तातडीने एमआयडीसी पोलीस स्टेशन (0257 – 2210500) अथवा पोलीस उप निरीक्षक दीपक जगदाळे (9028222666) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.