ऐनपूर येथे शौचालय पडक्या अवस्थेत,नागरिकांची गैरसोय ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

  सविस्तर वृत्त असे  की ऐनपुर(Ainpur) येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत लाखो रुपर्य खर्च करूण सार्वजानिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते पंरतु काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे काही दिवसांत सार्वजनिक शौचालय पडून गेले. [ads id="ads1"] 

  त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे Ainpur ग्रामपंचायत लक्ष देईल का? विशेष म्हणजे ऐनपूर गाव हगंणदारी मुक्त गाव आहे. परंतु सार्वजनिक शौचालय पडक्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने उघड्यावर शौचास जावे लागत आहे. याला जबाबदार कोण? तसे पाहिले तर ऐनपूर गावतील ५०% ग्रामस्थ हे सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असतात. [ads id="ads2"] 

  परंतु शौचालय पडक्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याला जबाबदार कोण? ग्रामपंचायतीने लवकरात लवकर नवीन शौचालयाचे बांधकाम करण्यात यावे, विशेष अभियानामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शोचालयात वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शोचालय परिसरात स्वच्छाता करणे, आणि सुशोभिकरण करणे तसेच शोचालयाची दुरुस्ती करणे यावर विशेष भर देऊन उपलब्ध शौचालयाचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. परंतु ऐनपूर(Ainpur) येथे सार्वजनिक शौचालया बाबतच्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. ऐनपूर(Ainpur) येथील शौचालयाची आत्यंत दुर अवस्था झालेली आहे. याकडे ऐनपूर ग्रामपंचायत लक्ष देईल का? लवकरात लवकर नवीन शौचालय उपलब्ध करून द्यावे अशी आशा नागरिक व्यक्त करत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!