Covid Relief Fund : कोविडमुळे मृतांच्या नातेवाइकांना अर्थसाहाय्यासाठी जळगाव जिल्ह्यातील 2326 अर्ज नामंजूर ; सुनावणी सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 Covid Relief


५० हजारांच्या अर्थसाहाय्यासाठी नामंजूर अर्जावर सुनावणी सुरू

कोवीड- १९ या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या लगतच्या नातेवाइकांना देण्यात असलेल्या ५० हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी पोर्टलवर शासनाकडून येत करण्यात आलेले २ हजार ३२६ अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नामंजूर केले आहेत. अपील केलेल्या नामंजूर अजांवर प्रमुख जिल्हा व मनपास्तरीय तक्रार निवारण समितींनी सुनावणीला सुरुवात केली आहे. ५० हजारांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जिल्ह्यातून बेव पोर्टलवर हजारावर ऑनलाइन अर्ज करण्यात आलेले आहे. [ads id="ads1"] 

  ग्रामीण भागातील जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा क्षेत्रातून आलेल्या अर्जांची प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली. ते अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ४ हजार ७८५ अर्ज मंजूर करुन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी पाठवलेले आहेत. [ads id="ads2"] 

  कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मृत्यू प्रमाणपत्र, इतर कागदपत्रांची अपूर्णता बाहेरील जिल्ह्यात झालेला मृत्यू आदी कारणांमुळे २ हजार ३२६ अर्ज नामंजूर केलेले आहेत. अर्ज नामंजूर झालेल्या हजार ३२६ अर्ज नामंजूर केलेले

हे ही वाचा :- Jalgaon : बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी गुन्हे दाखल करा : अधिष्ठातांचे आदेश 

हेही वाचा :- ऑनलाइन सोफासेट विक्री करण्याच्या नादात आयटी इंजिनिअरची फसवणूक

हेही वाचा :- सहा महिने लोटूनही यूडीआयडी कार्ड घरी येईना ;दिव्यांगांना नाहक त्रास

जळगाव जिल्ह्यातील 2326 अर्ज नामंजूर आहेत. अर्ज नामंजूर झालेल्या नागरिकांनी जिल्हास्तरावर व महापालिकास्तरावर तक्रार आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपील केलेली आहे. त्याबाबत तक्रार निवारण समितीकडून नामंजूर अर्जांवर सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. मनपा स्तरावरील नामंजूर अर्जावर शुक्रवारपासून सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे. मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रार निवारण समितीने १० नामंजूर अर्जावर सुनावणी घेतली. सुनावणीमध्ये सहा अर्जदारांकडून सुनावणीमध्ये कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्यात आली. त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हास्तरीय समिती सुनावणी घेणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!