भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेची अंमलबजावणी कधी होणार ? पालकवर्गात संतापाचे वातावरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ प्रतिनिधी ( अरुणकुमार तायडे ) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत बौद्ध समाजासह अनु.जातीतील प्रज्ञावान आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा ' मोठा डंका पिटला गेला मात्र आज पर्यंत या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला दिसत नाही  त्यामुळे ही योजना ' चुनावी जुमला ' आहे की काय असा सूर पालकवर्गातुन व्यक्त होत आहे.[ads id="ads1"] 

      या बाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती मिळाली कि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने ,अनु.जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी दहावी मध्ये नव्वद टक्के किंवा त्या पुढे मार्क्स मिळविले असतील अश्या विद्यार्थ्यांना जे ई ई,नीट,अश्या व्यावसायिक परीक्षांच्या तयारीसाठी मदत म्हणून ' डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेची' घोषणा करीत प्रसार माध्यमातून मोठा गाजा वाजा केला होता. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना अकरावी बारावी साठी एकूण दोन लाख रुपये मिळणार होते.[ads id="ads2"] 

          महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ' भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थात ' बार्टी' मार्फत ही योजनेची अंमलबजावणी होणार असे सामाजिक न्याय विभागाने जाहीर केले होते.

        गरीब अरे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जेईई नीट आधी परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी क्लासेस लावणे परवडत नाही कारण यांची फी चार ते पाच लाख रुपये असते म्हणून समाजातील काही प्रज्ञावान हुशार विद्यार्थ्यांना अशा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत म्हणून या योजनेची मुहूर्तमेढ पुरवण्यात आल्याचे सामाजिक न्याय विभागाचे म्हणणे आहे परंतु ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी पालकांना अनेक प्रमाणपत्र दाखल्यांसाठी भटकंती करावी लागली आर्थिक भार ही सहन करावा लागला त्यांच्या डोळ्यात आपल्या पाल्याचे भविष्य दिसून येत होते मात्र आज पर्यंत योजना जाहीर होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी फक्त विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून गेले फॉर्म भरून घेतल्याशिवाय अधिक समाधानकारक प्रगती दिसून येत नसल्याचे पालकांमध्ये चर्चा आहे या योजनेनुसार मिळणाऱ्या सदर अनुदानातून विद्यार्थ्यांनी जय जेईई नीट परीक्षांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य क्लास तसेच शैक्षणिक कामी येणारे साहित्य खरेदी करावे म्हणून अकरावीमध्ये 50 50 हजाराचे थेट अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचे समाज कल्याण विभागाने आपल्या जाहीर प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते सुरुवातीला फॉर्म भरण्याची मुदत दिं.३०/९ /२०२१ या तारखे पर्यंत होती ती मुदत संपल्यावर पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली ती मुदत ही दि.३०/१०/२०२१ रोजी संपली असून तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी  उलटून गेला तरी विद्यार्थ्यांच्या  पदरी निराशाच पडल्याने पालकात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने जनमानसाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता,या पालक वर्गामध्ये ज्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये येतील ही घोषणा केली आणि नंतर " ये चुनावी जुमला था" असे म्हणून बोळवण केली तशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजने ची गत होऊन ही योजना ही ' जूमला' ठरते  की काय? असे बोलले जात असल्याचे चर्चा आहे. ज्या बार्टी मार्फत ही योजना राबवले जाणार आहे त्या बार्टीचा जात पडताळणी बाबत लोकांचा चांगला अनुभव नसल्याचेही जनमानसात बोलले जातआहे .अनु.जातीच्या विद्यार्थ्याने अकरावीत असताना जात पडताळणी चा फॉर्म भरला असता, तो बारावीत असताना पडताळणी करून मिळेल असे सांगितले जाते ,काही मुलांचे बारावी नंतरही पडताळणी करून दिली जात नाही मग जेव्हा ती मुलं पुन्हा कागदपत्रे सादर करून पुढील वर्षी कार्यालयात जातात तेव्हा तुमच्या पाल्याने बारावी पास केलेली आहे सर्टिफिकेट जात पडताळणी प्रमाणपत्र हे फक्त अकरावी बारावी विज्ञान शाखेतील मुलांसाठीच देण्यात येते आता तो बारावीत नाही म्हणून त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही असे संबंधित जात पडताळणी कार्यालयाकडून सांगितले जाते असे बरेच पालकांचे म्हणणे आहे म्हणून अकरावी बारावी ची मुले बारावी पास होऊन पुढच्या वर्गात गेली तर आता या मुलांना ही विशेष अनुदान योजना देता येणार नाही असे या प्रकरणात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक लक्ष घालून या योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी मागणी पालक वर्गात जोर धरत  असल्याचे दिसून येते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!