महामहिम राष्ट्रपती यांना सदर पत्रात ....
"मा.राष्ट्रपति महोदय, नमस्कार...
भारत सरकारने 2004 साली भाषाना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने भाषा तज्ञाच्या समितिने एकमताने केलेली आहे.[ads id="ads2"]
याला आता 7 वर्षे उलटून गेली .साहित्य अकादमिने केलेली ही शिफारस ताबड़तोब आमलात येणे गरजेचे आहे.मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा,ज्ञानभाषा महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषामधली अग्रणी भाषा आहे.ह्या संदर्भातील अनेक पुराव्यानी हे सिद्ध होते की, मराठी ही अभिजात भाषा आहेच. तरी कृपया मराठीला तो दर्जा द्यावा , अशी आपल्याला महाराष्ट्रातील माविम महिलांची नम्र विनंती आहे. " ....कळावे .....
आशा आशयाचे पोस्टकार्ड लोणार तालुक्यातील 32 गावातील 1000 महिलांनि स्वतः लिहून आपले नावासह महामहिम राष्ट्रपति यांना पाठविले आहे. सदर उपक्रम माविम बुलडाणा जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायड़े यांचे मार्गदर्शनाखाली अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र, सुल्तानपुर च्या अध्यक्षा शोभाताई जाधव, कोषाध्यक्ष कोकिलाताई राखूंडे, प्रयाग नागरे,पँचफूला काकड़े, कांता साठे, नन्दा सालवे कार्यकारणी संचालक मंडल, केंद्र व्यवस्थापक गजेंद्र गवई, लेखापाल मयुरी गवई, सहयोगिनी रीना सरकटे, वर्षा पवार, मंगल आंधले, लीला मते, शिल्पा राउत यांचे सह सिआरपी , ग्रामसंघ , बचत गटाच्या महिलांचे विशेष योगदान मिळाले.