तीन घुसखोरांना कंठस्थान : १८० कोटीचे ड्रग्स जप्त ; कारवाईत सावद्यातील जवानांचा सहभाग

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 तीन घुसखोरांना कंठस्थान : १८० कोटीचे ड्रग्स जप्त ; कारवाईत सावद्यातील जवानांचा सहभाग


सावदा  प्रतिनिधी (समाधान गाढे)  जम्मू-काश्मीरच्या ‘सांबा’ सेक्टरमध्ये बीएसएफ (BSF) च्या पथकाने केलेल्या एका ऑपरेशनमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन घुसखोरांना यमसदनी धाडण्यात आले असून त्यांच्याकडून १८० कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अभिमानाची बाब म्हणजे या कारवाईच्या पथकात रावेर तालुक्यातील सावदा (Savda) येथील जवानाचा समावेश होता.[ads id="ads1"] 

सांबा सेक्टरमध्ये धाडसी कारवाई

या संदर्भात सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याची माहिती दिली. त्यानुसार “सांबा (Sambha) सेक्टरमधील ‘भारत-पाक’ दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून तीन पाकिस्तानी घुसखोर यांनी शनिवारी रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads2"] 

 भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना हा प्रकार लक्षात येताच तात्काळ कारवाई केली. यात तीन घुसखोर ठार झाले. त्यांच्याकडून ३६ किलो वजनाच्या सुमारे १८० कोटींच्या ड्रग्ससह शस्त्रे पथकाने हस्तगत केली आहेत. घुसखोर अमली पदार्थांचे पाकिस्तानी तस्कर असावेत अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

हेही वाचा : - रावेर येथे क्रुझर गाडीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू ;परिसरात हळहळ 

  मिशन फत्ते करणाऱ्या या पथकात जळगाव (Jalgaon ) जिल्ह्यातील ‘सावदा’ येथील जवान संदीप नारखेडे (Sandip Narkhede) यांचा देखील समावेश असून जळगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन घुसखोरांना भारतीय सैन्याने २१ राउंड फायर करीत कंठस्थान घातले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे १८० कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असेलेले सुमारे ३६ किलो ड्रग्स, पाकिस्तानी चलन तसेच १ पिस्तुल, १ मॅगजिन व ३ राउंड जप्त केले. यात विशेष अभिमानाची बाब म्हणजे या कार्यवाहीत सावदा येथील सुनील नारखेडे यांचे भाऊ जवान संदीप नारखेडे हे देखील कारवाईच्या पथकात सहभागी होते. त्यांनी आपल्या अतुल्य पराक्रमाने या पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्तान घातले.

जवानांना सैन्यदलातर्फे बक्षीस

या कामगिरीबद्दल या सर्व जवानांना सैन्यदलातर्फे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीने सावदावासियांची मान उंचावली असून त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!