रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील पुनखेडा (Punkheda) पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी संबंधीत ठेकेदार वाळू ची रॉयल्टी न भरता महसूल प्रशासनाकडून वाळू वाहतुकीची कोणतीही परवानगी न घेता सर्रास अवैध वाळू वाहतूक करून पुलाचे बांधकाम जोमात सुरु आहे.[ads id="ads1"]
या संदर्भात प्रसार माध्यमांनी 'पुनखेडा पुलाच्या बांधकामासाठी सर्रास होतोय अवैध वाळूचा वापर' या मथळ्याखाली माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्याची दाखल घेत रावेर तहसीलदार (Raver Tahsildar) उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार (Nayab Tahsildar) संजय तावडे यांनी तातडीने सर्व मंडळधिकाऱ्यांची (Circle,) बैठक घेत मंडळ अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत रॉयल्टी तपासण्याचे आदेश दिले.[ads id="ads2"]
आपण आपआपल्या भागात काय बघतात ? अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया करा. तसेच आपआपल्या भागात सुरु असलेल्या इतर शासकीय बांधकामांच्या कामांवर पाहणी करून संबंधीत ठेकेदारांनी तसेच बांधकाम धारकांनी वाळू कोठून आणली? रॉयस्टी भरली आहे किंवा नाही? वाळू वाहतुकीची परमिशन घेतली आहे का? वाळू वाहतुकीच्या पावत्या असतील तर त्या सादर करा व याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडळाधिकाऱ्यांना दिले.
==============================
हेही वाचा: - Jalgaon : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी
हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या
हेही वाचा :- दुर्दैवी : सेप्टिक टॅँकमध्ये पडून दीडवर्षीय बालकाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या
हे पण वाचा :- दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील टीव्ही,फ्रीज, मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत
=========================
इतर विभागांना सुद्धा दिले पत्र
रावेर तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय बांधकाम वरील संबंधित ठेकेदाराने रॉयल्टी भरलेली आहे का ? तसेच वाळू, गौण खनिज वाहतुकीची परवानगी महसूल प्रशासनाकडून घेतलेली आहे का ? याची तपासणी संबंधित विभागाच्या प्रमुखांनी तपासणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र रावेर तहसीलदार (Raver Tahsildar) उषाराणी देवगुणे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग अशा प्रकारचे ज्या ही विभागामार्फत शासकीय बांधकामे चालतात अशा विभाग प्रमुखांना पत्र देऊन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी तात्काळ अहवाल मागविला आहे.