यावल पोलिसांची सतर्कता
यावल (सुरेश पाटील) अवैध सावकारी प्रकरणात यावल पोलिसांनी (Yawal Police) गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणातील यावल शहरातील दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील जप्त केलेला मुद्देमाल यावल न्यायालयाच्या आदेशानुसार टीव्ही,फ्रीज,मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत केल्या.या कारवाईमुळे यावल पोलिसांचे (Yawal Police) सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
आर्थिक अडचणीत असलेल्या एका गरीब नागरिकाने यावल शहरातील एका दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराकडून 50 हजार (Fifty Thousand) रुपये व्याजाने घेतले होते या रकम व्याजापोटी सावकाराने 1 लाख 35 हजार रुपये अव्वाचे व्याज वसूल केल्यावर सुद्धा सावकाराने तारण ठेवलेले टिव्ही (T.V.) ,फ्रिज,मोबाईल (Mobile) ,परत न करता पुन्हा व्याज वसुलीची धमकी देत होता.[ads id="ads2"]
सावकाराच्या या मनमानी बेकायदेशीर कृत्यास तक्रारदार वैतागला होता त्यामुळे त्यांनी यावल पोलीस स्टेशनला (Yawal PoliceStation) तक्रार केली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधीर पाटील (PI Sudhir Patil) यांनी व त्यांच्या पथकाने चौकशी कारवाई करत सावकाराच्या घरातून वरील वस्तू ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता आणि आहे.
हेही वाचा :- शासकीय बांधकामांवरील वाळूच्या रॉयल्टी तपासण्याचे रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांचे आदेश
हेही वाचा: - Jalgaon : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी
हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या
हेही वाचा :- दुर्दैवी : सेप्टिक टॅँकमध्ये पडून दीडवर्षीय बालकाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना
या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त मुद्देमाल दहीगाव येथील तक्रारदार गुलाब कडू मिस्तरी उर्फ रूले यास यावल पोलिसांनी (Yawal Police) काल दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी टीव्ही (TV) फ्रिज (Freeze) मोबाईल (Mobile) इत्यादी मौल्यवान वस्तू तक्रारदारास परत केल्या यामुळे तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये तसेच व्याजाने पैसे देऊन अव्वाच्या सव्वा दराने व्याज वसूल करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
पोलीस निरीक्षक यांचे जाहीर आवाहन
अवैध अनधिकृत सावकार यांनी ज्या नागरिकांना बेकायदा व्याजाने पैसे दिले आणि अनधिकृतपणे दुचाकी (Two Wheeler) ,चारचाकी वाहने (Four Wheeler) ,प्लॉट (Plot) ,शेती,घर,सोने,चांदीचे दागिने घरातील मौल्यवान वस्तू ताब्यात घेऊन दादागिरीने व्याज वसूल करीत आहेत याबाबत यावल पोलीस स्टेशनला (Yawal Police Station) तक्रार करून बेकायदा सावकाराच्या दादागिरीतून आणि तावडीतून सुटका करून घ्यावी असे जाहीर आवाहन यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.

