पालघर - आदिवासी उत्कर्ष सामाजिक संस्था संचलित कै. नथ्थू ओझरे कनिष्ठ महाविद्यालयात वडवली ता तलासरी जि पालघर येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी 12वीच्या विद्यार्थ्यांनचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आला 11वी कला शाखेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत केले. स्वागता नंतर बारावीच्या कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केले वर्षभरातील महाविद्यालयातील अनुभव व्यक्त करत असताना विद्यार्थी अत्यंत भावुक झाले मनोगत त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विज्ञान विभाग प्रमुख तल्हा सर ,वाणिज्य विभाग प्रमुख शनवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र काकडे सर यांनी विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये
त्यांनी निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुंदरसे गीताचे गायन केले आणि पुढील आयुष्यासाठी आणि परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील बेंदर सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार तल्हा सर यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर ओझरे सर तसेच संचालक मंडळ व सदस्य यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात 400 विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
