27 फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजता भोलासिंग बावरी (रा. शिकलकर वाडा शिरसोली नाका जळगाव) हा त्याच्या दोघा मित्रांसह सिंधी कॉलनीनजीक चेतनदास दवाखान्याजवळ उभा होता. त्यावेळी पल्सर मोटार सायकलवर तिघे तरुण त्याच्याजवळ आले. [ads id="ads1"]
त्यातील एकाने भोलासिंग यास मारहाण करत त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भोलासिंगच्या पोटात व हातावर जखम झाली. त्यानंतर तिघे अज्ञात तरुण पळून गेले. जखमी भोलासिंग बावरी यास सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.[ads id="ads2"]
त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच सहायक फौजदार अतुल वंजारी, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अज्ञात हल्लेखोरांच्या मागावर पोलिस पथक आहे. पुढील तपास हे.कॉ. योगेश सपकाळे करत आहेत.

