प्रथम विजेत्या संघास बक्षीस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवानेत्या रोहीणी खडसे यांचे कडून ५१ हजार रूपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघास तांदलवाडी सरपंच सुरेखा तायडे यांचेकडून बक्षीस म्हणून २५ हजार रूपये तरतृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघास राजूर अहमदनगर येथील गौराम बीडवे यांचे कडून बक्षीस म्हणून ११ हजार रूपये तर मॅन ऑफ द सिरिज साठी ग्रा.पं.सदस्य शशांक पाटील यांचे तर्फे ५ हजार रुपये बक्षीसे दिले जातील. परिसरातील ३२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.[ads id="ads2"]
तांदलवाडी येथे रविवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र युवक सचिव संदीप पाटील, पं.समिती सदस्य दिपक पाटील,सरपंच सुरेखा तायडे, ग्रा.पं. सदस्य शशांक पाटील, साधना कोळी, सिद्धार्थ तायडे, श्रीकांत चौधरी आदींची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी योगेश्वर केळी, शेख अकिल, अरविदं पाटील,भागवत कोळी, दत्तात्रय तायडे, सागर खवले तसेच महाएकता फाऊंडेशन परिश्रम घेत आहेत.

