सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मधे सोमवार दि.28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. [ads id="ads1"] 

       राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बालसंस्कार विद्यामंदिर शाळेचे विज्ञान शाखेचे शिक्षक नितीन बारी सर उपस्थित होते. सर्वात प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन नितीन बारी सर यांचा सत्कार करण्यात आला व सरांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.[ads id="ads2"] 

  नितीन बारी सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व सविस्तरपणे समजावून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कु.फाल्गुनी विनोद चौधरी हिने केले.इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी अत्यंत कुशलतेने विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.विद्यार्थी प्रात्यक्षिक करताना अत्यंत उत्साहित होते . तसेच त्यांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रत्येक प्रयोगासाठी योग्य प्रकारे परिश्रम घेतले.सहभागी विद्यार्थिनींची कार्यकुशलता कौतुकास्पद ठरली.या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसून आला . एकंदरित या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विशेष भर पडली अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.मनिषा बडगुजर मॅडम,सौ.सविता बारी मॅडम,सौ.सुवर्णा पाटील मॅडम,सौ.शुभांगी बाऊस्कर मॅडम,सौ.टिना निंबाळे मॅडम,कु. उमेरा शेख मॅडम,सौ.तिलोत्तमा महाजन मॅडम,कु.धनश्री महाजन मॅडम,सौ.कुंदा नारखेडे मॅडम, सौ.कामिनी बोंडे मॅडम,सौ.तृप्ती पवार मॅडम,सौ.योगिता सावळे मॅडम,कु.श्रद्धा साळुंके मॅडम, 

सौ.प्रविणा पाचपांडे मॅडम कु. झीनत शेख मॅडम व प्रशांत फेगडे सर,यांच्यासह कुसूम फालक मॅडम,सौ.मिनाक्षी वारके मॅडम, यांनी उत्कृष्टपणे नियोजन केले होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.अमृता कुलकर्णी मॅडम यांनी व्यक्त केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!