रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) झाडाची फांदी तोडत असतांना विळा हाताला लागल्याने गंभीर जखमी होवून ४४ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथे घडली आहे.याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भगवान लक्ष्मण शिंगोटे (वय-४४) रा. बक्षीपूर ता. रावेर (Bakshipur Taluka Raver) हे घरासमोर असलेल्या झाडावरील फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले. [ads id="ads2"]
त्यावेळी झाडीची फांदी विळ्याने तोडत असतांना त्यांच्या हाताला विळा लागला. यात मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भगवान शिंगोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सतीष सानप करीत आहे.

