राष्ट्रीय पातळीवरील झालेल्या 8 व्यां स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाला घवघवीत यश....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव (सुरेश पाटील) दिनांक 24,25व26 तारखेला दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. [ads id="ads1"] 

     जळगाव येथे रेल्वे स्टेशनवर खेळाडूंचा जिल्हा सचिव योगेश चौधरी,जिल्हा सदस्य कोमल पाटील,किरण तायडे,आकाश पाटील,आरोही नेवे,विद्या कोळी, ऐश्वर्या पाटील,रितेश भारंबे यांनी स्वागत केले.जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण जिल्ह्याने दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नेतृत्व केले.[ads id="ads2"] 

  स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे व्हॉलीबॉल टीम (चोपडा)मधील मयूर पाटील,स्वप्नील माळी, प्रतीक नगराळे,दिग्विजय पाटील, सिद्धार्थ वाघ,हर्ष वाघ,वैभव डोके,विशाल कविरे,योगेश साळुंखे,अभिषेक पाटील आणि जयेश पाटील या खेळाडूंना सिल्व्हर मेडल मिळाले.तसेच ॲथलेटीक्स स्पर्धेत जळगाव जिल्हा संघातील चौगाव ता.चोपडा येथील विशाल पारधी (5 किमी.धावणे,गोल्ड मेडल), शुभम पाटील (100 मी.धावणे, ब्राँझ व 200 मी.धावणे,सिल्व्हर मेडल),वासुदेव कोळी(10 किमी.धावणे,गोल्ड मेडल)उमेश धनगर (3000मी.धावणे,ब्राँझ मेडल),मारवड ता.अमळनेर येथील कुंदन शिरसाठ( 800मी, ब्राँझ मेडल)सारबेटे ता.अमळनेर येथील आदित्य पाटील(थाळी फेक,सिल्व्हर मेडल)मिळाले. असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी दिली.जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनचे कोच पवन पाटील सर (चोपडा), चेतन पाटील सर,सागर पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा टीमच्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!