न्हावीच्या तरुणास तीन तलवारींसह जेरबंद : त्याच्यासोबत अजून सहा जणही अटकेत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 न्हावी ता.यावल प्रतिनिधी (किरण तायडे) जळगाव (Jalgaon)  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणाऱ्या तरुणास न्हावी, ता. यावल (Nhavi Taluka Yawal) या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील (Ketan Madhukar Patil)  असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली.[ads id="ads1"] 

  दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने भुसावळ (Bhusawal) जवळील अकलूद(Aklud)  गावाजवळील एका हॉटेलजवळून गावठी कट्टा हस्तगत गेला होता. त्यानंतर तलवारी मिळून आल्याची कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"] 

  न्हावी (Nhavi)  गावातील वाणीवाडा भागातील रहिवासी केतन मधुकर पाटील याच्या कब्जातून १५ हजार रुपये किमतीचा तीन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तलवारीच्या धाकावर तो गावात व परिसरत दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे. कॉ. महेश महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय चौधरी यांना पुढील कारवाई कामी रवाना केले. पथकाने केतन पाटील याचा ठावठिकाणा मिळवून त्याला तलवारीसह ताब्यात घेतले. त्याला फैजपूर पोलिसांच्या (Faijpur Police) ताब्यात देण्यात आले आहे. तपास सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर व हेडकॉन्स्टेबल राजेश बराटे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!