रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील तामसवाडी (Tamaswadi) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरील ठिबक (Thibak) सिंचनच्या चार हजारांचे सहा बंडल चोरून नेणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात आले आहे. चोरट्याने अॅपेरिक्षाने (Ape Rickshaw) ठिबकचे बंडल नेल्याची माहिती मिळताच सरपंच महेंद्र कोळी (Sarpanch Mahendra Koli) व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग सुरू केला. [ads id="ads1"]
रेल्वे (Railway) वाहतुकीसाठी बंद झालेल्या तामसवाडी रेल्वे (Tamaswadi Gate) गेटवर ही रिक्षा उभी होती. त्याला मुद्देमालासह रंगेहात पकडून रावेर पोलिसांच्या (Raver Police) स्वाधीन केले. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार झाला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चोरट्यास अटक करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
तामसवाडी शिवारातील (Tamaswadi Shivar) नितीन दगडू चौधरी यांच्या शेताच्या बांधावर ठेवलेले ठिबक सिंचनचे चार हजार रुपये किमतीचे सहा बंडल दि. ६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी फिरोज सुभान तडवी व त्याचा साथीदार बबलू महेमूद तडवी (दोन्ही रा. भोकरी, ता. रावेर) यांनी चोरली होती. आरोपी फिरोज सुभान तडवी यास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :- गॅसगिझर गळतीने महिला वैमानिकेचा मृत्यू; नाशिकमधील पंधरा दिवसातील दुसरी घटना
हेहे वाचा :- शेतातील झाडाला गळफास घेऊन 23 वर्षीय युवकाची आत्महत्या
हेहे वाचा :- स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री : मुक्ताईनगर तालुक्यातील दुकानदाराविरोधात गुन्हा
हेही वाचा :- किनगाव येथील तरूणाशी लग्न करून पैसे घेवून पसार झालेल्या नववधूला पोलीसांनी केली अटक
ठिबक सिंचनच्या नळ्यांचे बंडल व ४० हजार रुपये किमतीची रिक्षा असा ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रावेर पोलीस स्टेशनचे (Racer Police Station) पोलीस निरीक्षक कैलास नागरे (PI Kailas Nagare) यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले (Sachin Navale) पुढील तपास करीत आहेत.

