जनरल तिकीट सुरू करा, रावेर हून पुणे साठी रेल्वे सेवा व अन्य मागण्यासाठी रेल्वे विभागाने लक्ष द्यावे - प्रशांत बोरकर यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  रावेर रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप तर्फे आज स्टेशन अधीक्षक रावेर यांना विविध मागण्याचे निवेदन सामजिक कार्यकर्ते श्री प्रशांत बोरकर यांचे नेतृवाखाली देण्यात आले.[ads id="ads1"] 

  रेल्वेचे जनरल तिकीट  सुरू करावे मासिक पास सुरू करावेत रावेर स्टेशन वर पुण्यासाठी पुणे  दानापुर  एक्स्प्रेस तसेच महानगरी एक्स्प्रेस चा  थांबा द्यावा.खंडवा बुऱ्हाणपूर रावेर सावदा निंभोरां मार्गे पुणे सुरत  अमरावती साठी  फास्टपसेंजर सुरू करावी.[ads id="ads2"] 

   रावेर हून जळगाव साठी सकाळी सात वाजता जलगावं  साठी मेमू ट्रेन सुरू करावी खंडवा जळगाव नंदुरबार साठी मेम्मु ट्रेन सुरु करावी  रावेर हे लोकसभा  केंद्र आहे म्हणून रावेर खंडवा हून रेल्वे प्रवासी गाड्या सुरू झाल्या पाहिजेत असे  निवेदनात म्हटले आहे

निवेदनावर श्री प्रशांत बोरकर रामकृष्ण चौधरी सुभाष अकोले. मनोहर लोहार डी डी वाणी फोटोग्राफर यांचे सह प्रवाशी राष्ट्रीय जनता दल कार्यकर्ते  उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!