जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहातील बॅरेक ३ मध्ये ५ महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यात कैद असलेल्या संशयित आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) रा. खेडी बु ता.जळगाव (Khedi Taluka Jalgaon) याने मध्यरात्री लोखंडी गजाला रुमालाची दोरी करून गळ्याला फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads2"]
हा प्रकार सोबत असलेल्या कैद्याच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरड केली व त्याचे पाय धरून ठेवले. यावेळी जिल्हा कारागृहात (Jalgaon District Jail) रात्रीला गस्त असलेले जेल पोलीस (Jail Police) शिपाई राजू ढोबाळ, नदीम शहा, गजानन राठोड, धिरज शिंदे, राजेंद्र सावकारे यांनी धाव घेऊन अमोल सोनवणे याला तात्काळ त्याला खाली उतरले व जिल्हा शासकीय वैद्यकीय (Jalgaon Civil Hospital) महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत जेल पोलीस (Jail Police) शिपाई राजू भवानीसिंग ढोबाळ यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी संशयित आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी अमोल सोनवणे हा गेल्या ५ महिन्यांपासून जळगाव जिल्हा कारागृहात बांधकाम ठेकेदाराच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे. खुनाच्या संशयावरून त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

