भुसावळ : येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर पुरी गांधीधाम या गाडीतून उतरून शहरांमध्ये तस्करीच्या इराद्याने दोन लाख रुपये किमतीचा वीस किलो गांजा घेऊन जात असताना लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दोन अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
गाडी क्रमांक २२९७४ पुरी गांधीधाम या गाडीच्या सामान्य डब्यातून भुसावळ रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर उतरून २ लाख किमतीचा २० किलो गांजा तस्करीच्या इराद्याने शहरात घेऊन जात असताना दोन अल्पवयीन रा. सोहापूर होशंगाबाद (मध्य प्रदेश )व त्यांच्या सोबतचा अन्य एक जण सुकलाल रा.होशंगाबाद यास लोहमार्गचे मधुकर गुप्ता तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे दिलीप यादव, वसंत महाजन यांनी पकडले. दरम्यान यातून सुकलाल हा फरार झाला.[ads id="ads2"]
तर दोन्ही अल्पवयीन संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी बाल सुधार गृह येथे पाठविण्यात आले आहे.ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राधाकिशन मीना व लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, रेल्वे स्थानकावर काही दिवसांपासून श्वान पथकही आहे.

