सुवर्ण दिप वृत्तसेवा : यावल तालुक्यातील भालोद येथील एका ४५ वर्षीय इसमाने शारीरिक त्रासामुळे झोप येत नसल्याच्या नैराश्यातून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. [ads id="ads2"]
मयताचे नाव ललित जनार्दन परतणे असे आहे. ललित याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी लीलाधर नारायण चौधरी रा. बामणोद यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक किरण चाटे करीत आहे.
हेही वाचा :- धक्कादायक : धावत्या रेल्वे समोर दोन चिमुकल्यांसह बापाने उडी घेवून संपवली जीवनयात्रा
हेही वाचा :- जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याचा गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न

