रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
रावेर येथे आज दि. १४ फेब्रुवारी सोमवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेचे पंचायत समिती रावेर येथे निदर्शने करण्यात आली .[ads id="ads1"]
निदर्शनाचे विषय पुढीलप्रमाणे (१ ) रावेर तालुका पं . स . वैयक्तिक लाभाच्या झालेल्या भ्रष्टाचारा संबधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे (२) ग्रामिण भागातिल अतिक्रमित घरे गाव नमुना ८ नंबर ला नोंद करून गरजुना घरकुलाचा लाभ देण्यात यावा.[ads id="ads2"]
(३) दलित वस्तीत सन २०२०/२०२१ या वर्षात जी विकास कामे निकृष्ट दर्जाचे झालेली आहे संबंधीतांवर कार्यवाहि करून भविष्यात त्यांना कंञाट देण्यात येऊ नये. (४) गोलवाडे गावातिल ग्रामसेवकांने बेलदार समाजाच्या महिलेचा अपमान केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी (५) ज्यांच्या जवळ जागा नाही त्यांना ते आजरोजी राहत असलेल्या जागेवरच घरकुल योजनेचा लाभ दयावा या गोरगरिबांच्या समस्या पं . स . रावेर गटविकास अधिकारी श्रीमती कोतवाल मॅडम यांनीही लक्ष दयावे नाहीतर भविष्यात हे आंदोलन तिव्र स्वरूपाचे होईल तसेच होणाऱ्या परिणामास पं . स . रावेर जबाबदार राहिल . असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निळे निशाण सामाजिक संघटचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष महेशजी तायडे, सदाशिव निकम, सुधीर सैंमिरे, नारायण सवर्ण, शरद बगाडे, विजय धनगर, बाळु निकम, अरविंद भालेराव, रोहीदास तायडे, विलास तायडे, रविंद्र कोळी, संगम लोणारी सोपान तायडे यांच्यासह असंख्ये महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्ये उपस्थित होते.

