यावेळी खा.रक्षा खडसे यांनी मनोगत करतांना सांगितले की, ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी नियमित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे. प्रथम सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांना त्यांनी सदिच्छा दिल्या. [ads id="ads2"]
त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी खेळपट्टी तयार करणारे गणेश घटे, बबलू बोदडे, सादिक खान यांच स्वागत करण्यात आलं. या स्पर्धेच्या आयोजनासाठी स्माईलिंग स्टोन फाउंडेशन व पाचपांडे मल्टीस्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने प्रथम बक्षीस डॉ.श्री. प्रविण दादा पाचपांडे यांनी ३३,३३३रुपये तर द्वितीय बक्षीस श्री जगदंब हॉस्पिटलचे डॉ.श्री.ललित पाटील सर तसेच निर्भय चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉ.श्री.निखील अभय जैस्वाल व गोरे हॉस्पिटलचे डॉ.श्री.मिलिंद गोरे यांच्या तर्फे २२,२२२ रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये केवळ ३२ संघांना प्रवेश मर्यादित करण्यात आलेला आहे.
यावेळी खा.रक्षा खडसे यांच्या समवेत माजी सरपंच तथा नगरसेवक ललितभाऊ महाजन, डॉक्टर श्री.प्रवीणदादा पाचपांडे, डॉ.ललित पाटील, डॉ. सचिन चौधरी, डॉ.अमोल चौधरी, डॉ.विक्रांत जैस्वाल, डॉ.निखिल अभय जैस्वाल, डॉ.मिलिंद गोरे, डॉ.वायकोळे, रवी तायडे सर, मुक्ताई क्लासेसचे संचालक योगेश राणे सर, अविनाश नाईक सर, रोहन अग्रवाल, सरदार सर, श्रीकांत पाटील, सोपान पाटील, आशिष भंसाली, सचिन सुरपाटणे, अभय भंसाली, डॉ.कृष्णा गायकवाड, उमेश पाटील, मोहन कोळी, करण पथरोड, भोला तेजी, साईम खान, शाहरुख खान, नरेंद्र शिर्के सर आदी उपस्थित होते.

