रविवारी सकाळी आशाबाबा नगर (Aasha Baba Nagar) रेल्वे बोगदा ते खंडेराव नगर रेल्वे बोगदा दरम्यान रेल्वे (Railway)रुळावर दादर अमृतसर एक्सप्रेसचा (Amritsar Express) धक्का लागल्याने एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या अंगात निळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाची बारीक डिझाईन असलेला आणि पांढऱ्या रंगाची लेगीज पँट आहे.[ads id="ads2"]
याप्रकरणी रेल्वे स्टेशन मास्तर (Railway Station Master) यांनी कळविल्याने रामानंद नगर पोलीस (Ramanand Nagar Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :- न्हावीच्या तरुणास तीन तलवारींसह जेरबंद : त्याच्यासोबत अजून सहा जणही अटकेत
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील निंबोलच्या दोन्ही बहिणींनी मिळवला सीए होण्याचा मान
मयत महिलेबाबत काही माहिती मिळून आल्यास रामानंद नगर पोलीस (Ramanand Nagar Police) पो.स्टे.ला 0257-2282864 यावर किंवा तपासी अंमलदार अजित पाटील यांना मोबाईल क्रमांक 8208336689 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

