खोटा मृत्यू दाखला अन् वारस नसल्याचे भासवून यावल तालुक्यात फसवणूक ; ११ जणांविरुद्ध गुन्हा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 ११ वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याचा यावलमध्ये उलगडा, ११ जणांविरुद्ध गुन्हा

यावल शहरातील एका व्यक्तीची तब्बल २० वर्षानंतर मृत्यूची नोंद केली. त्यास मुली नाही, असे भासवून ११ जणांनी फसवणूक केली. खोटे दस्तऐवज सादर करत चार मिळकतीवर स्वतः वारस असल्याची नोंद केली. तब्बल १९ वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या प्रकारात एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल झाला.[ads id="ads1"] 

सायराबी शेख उस्मान (रा. डांगपुरा, यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शेख गुलाम नबी शेख गुलाम रसूल मोमीन, अ. नबी शेख गुलाम रसूल मोमीन, गुलाम दस्तगीर शेख गुलाम रसूल मोमीन, शेख रईस शेख गुलाम रसूल मोमीन, शेख शकील शेख गुलाम रसूल मोमीन, शेख सईद शेख गुलाम रसूल मोमीन, शेख जावेद गुलाम रसूल मोमीन, सै. इफ्तेखार से लियाकत, शेख मोहंमद हुसेन शेख अकबर, शेख कलीम शेख याकूब व शेख आरिफ शेख सिकंदर (सर्व रा. डांगपुरा, ता. यावल) या ११ जणांनी त्यांचे वडील शेख कादर शेख अहमद मोमीन यांच्या मृत्यूची २० वर्षांनंतर १ डिसेंबर २०१० रोजी मृत्यू झाल्याची खोटी नोंद पालिकेकडे ७ डिसेंबर २०१० रोजी केली. [ads id="ads2"] 

  फिर्यादी व तिच्या बहिणी अशा हयात असताना मृत शेख कादर मोमीन यांना मुली नाहीत, असे खोटे दर्शवून आपणच त्यांचे वारस असल्याचे भासवले. मृताच्या सिटी सर्वे क्रमांक ३१६१, ३९९६, ३१९७ व ३९९८ या सर्व मिळकतीवर १ ते ७ जणांनी वारस म्हणून २१ फेब्रुवारी २०११ रोजी स्वतःची नावे लावली. फिर्यादीची संगनमताने फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे.


मिळकतींच्या पडताळणीत उघड झाला प्रकार


संबंधित मिळकती कधीकाळी आपल्या आई-वडिलांच्या होत्या. त्यांचा व्यवहार कधी झाला ? याच्या पडताळणीसाठी फिर्यादीचा मुलगा शेख अतर शेख उस्मान याने १७ ऑगस्ट २०२९ रोजी फेरफार नोंदी १९ पूर्वी घडलेला प्रकार उघडकीस आला. संपूर्ण कागदपत्रांची खरी नक्कल मिळवून यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यातआला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!