मुंबई पॅसेंजर बंद करून त्या ऐवजी रेल्वे प्रशासनाने भुसावळ इगतपुरी शटल सुरू केली. मात्र मुंबई जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीने अडचणी येत आहेत. देवळाली शटल सुरू केल्यास अप-डाऊन करणाऱ्यांना ही गाडी सोईची होणार आहे.
भुसावळ- इगतपुरी शटल ही गाडी मुंबईपर्यंत वाढवावी, कारण भुसावळसह परिसरातील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी एकही पॅसेंजर गाडी नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. [ads id="ads2"]
यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबेल. सकाळी सुरू केलेल्या इगतपुरी शटलने दुपारी तीनपर्यंत इगतपुरीपर्यंत जाता येते. नंतर तेथून बस अथवा खासगी वाहनाने कासारा जाऊन तेथून लोकल पकडून मुंबईत जावे लागते. यामुळे प्रवाशांना सामान घेऊन कासाऱ्यापर्यंत जाणे व लोकलमध्ये बसणे जिकिरीचे झाले आहे.
हेही वाचा : - Covid Relief Fund : कोविडमुळे मृतांच्या नातेवाइकांना अर्थसाहाय्यासाठी जळगाव जिल्ह्यातील 2326 अर्ज नामंजूर ; सुनावणी सुरू
हे ही वाचा :- Jalgaon : बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी गुन्हे दाखल करा : अधिष्ठातांचे आदेश
हेही वाचा :- ऑनलाइन सोफासेट विक्री करण्याच्या नादात आयटी इंजिनिअरची फसवणूक
हेही वाचा :- सहा महिने लोटूनही यूडीआयडी कार्ड घरी येईना ;दिव्यांगांना नाहक त्रास
खासदार, आमदार यांनी पुढाकार घेऊन मुंबई पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, गाडी सुरू झाल्यास मुंबई जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून हुतात्मा एक्स्प्रेसही बंद करण्यात आली आहे.
ही गाडी सुरू झाल्यास प्रवाशांना कल्याणपर्यंत जाणे सोईचे होणार आहे. मात्र हुतात्मा एक्स्प्रेस बंद ठेवल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ हुतात्मा एक्स्प्रेस गाडी सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी विभागातून होत आहे.