चोपड्याच्या भीषण अपघातात माय-लेकींचा मृत्यू तर पतीसह मुलगा गंभीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


चोपड्याच्या भीषण अपघातात माय-लेकींचा मृत्यू तर पतीसह मुलगा गंभीर

चोपडा प्रतिनिधी : भरधाव आयशर वाहन दुचाकीवर उलटून झालेल्या भीषण अपघातात माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील पिता-पूत्र जखमी झाले. सोमवार, 28 रोजी सकाळच्या सुमारास चोपडा शहरातून जाणार्‍या धरणगाव -चोपडा रस्त्यावर हा अपघात घडला.[ads id="ads1"] 

या अपघातात उज्वला जगदीश मोतीराळे (37) व मुलगी नेहा जगदीश मोतीराळे (12, दोन्ही रा.मामळदे, ता.चोपडा) या माय-लेकींचा मृत्यू झाला तर मयत विवाहितेच्या पतीसह मुलगा गंभीर जखमी झाला आहे.[ads id="ads2"] 

माय-लेकींचा जागीच मृत्यू

सोमवारी सकाळी आयशयर चोपडा शहरातून धरणगावच्या दिशेने जात होता. यावेळी आयशर वाहनाच्या मागे दुचाकी होती मात्र दुचाकीस्वार सरळ जात असतांना अचानक आयशर चालकाने रस्त्याच्या बाजूला वळत घेताच दुचाकीवर आयशर कोसळले. या अपघातात उज्वला जगदीश मोतीराळे व त्यांची मुलगी नेहा मोतीराळे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक असलेले त्यांचे पती व चोपडा तालुक्यातील मामलदे येथील रहिवासी जगदीश भीमराव मोतीराळे (40) व आवेश जगदीश मोतीराळे (10) हे गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसांची अपघातस्थळी धाव

घटनास्थळी तत्काळ चोपडा शहर पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातानंतर आयशर चालक पसार झाला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!