अज्ञात वाहनाच्या धडकेत यावल चा दुचाकी स्वार जागीच ठार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव-भुसावळ महामार्गावर असलेल्या बुलेट शोरूम समोर २७ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सुमारास घडली.[ads id="ads1"] 

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर विजय राणे (वय-३०) रा. हिंगोणा ता. यावल ह.मु. जळगाव हा तरुण जळगाव शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. दरम्यान २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सागर राणे हा कामाच्या निमित्ताने दुचाकीने हिंगोणा येथे राहत्या घरी गेला होता. [ads id="ads2"] 

  त्यानंतर रात्री दुचाकीने परत जळगावकडे येत असताना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून शहरात येत असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सागर राणे हा तरुण जागीच ठार झाला आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जिल्ला शासकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी पल्लवी, आईचा चारूलता, वडील विजय वासुदेव राणे असा परिवार आहे, दरम्यान एकुलता एक मुलगा गेल्याने राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, याप्रकरणी शरद रमेश जावळे वय (वय-४६) रा. रोझोदा ता. रावेर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!